रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा शहरातील राम आळी भागात असणाऱ्या पीठ व मसाला गिरणीच्या बेल्ट मध्ये पाय अडकून गिरण मालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल (शनिवार) सायंकाळी घडली होती. कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी त्यांना हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

शहरातील तेली आळी येथे राहणारे अनिल भार्गव पोटफोडे (वय ५७) यांची राम आळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना गिरणीच्या बेल्टमध्ये पाय अडकून ते मशीन मध्ये खेचले गेल्‍याची घटना घडली होती. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या अनिल पोटफोडे यांचे शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. आज त्यांचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात आला.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here