मालवण; पुढारी वृत्तसेवा : विषारी औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी राहुल श्रीकृष्ण जाधव (वय ३७) रा. चाफेखोल मालवण याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राहुल याला मालवण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विषारी औषध पोटात गेल्याने प्रकृती अस्वस्थ बनलेल्या राहुल याच्या पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांअंती तिची प्रकृती स्थिर असून तिचा घडलेल्या घटने बाबत पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

पती राहुल याचे अन्य महिलेशी प्रेमसंबंध असल्याने तो आपल्याला सतत त्रास देत होता. घरातून जाण्यास सांगत होता. असेही संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आपल्याला दोन मुले असल्याचे तिने सांगितले आहे.

या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारी नुसार भादवी कलम ३०७, ५०६, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एसएस बंगडे, पोलीस कर्मचारी पांचाळ, चिपकर, मोरे हे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here