रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण किनारपट्टी भागात शनिवारी वाढत्या तापमानात अवकाळी मळभ कायम होते. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात विजांच्या लखलखाटात मेघगर्जेनेसह हलका पाऊस पडला. रविवार दि. 16 एप्रिल रोजी असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र किनारपट्टी भागात उष्ण लहरींचा विस्तार पार तळकोकणापर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यात काही भगात हलका पाऊस झाला. शनिवारी पहाटेही काही भगात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. त्यामुळे कोकणातील चारही जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी ढग कायम असताना तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

अवकाळीच्या टांगत्या तलवारीने आंबा बागायततीत शेवटच्या आब्यांची काढणावळ शिल्लक असून, पाऊस हजेरी लावायच्या आत त्याची सुरक्षित ठेवणीची लगबग सुरू झाली आहे. पावसात फळ भिजल्यास हाती आलेले उत्पादन वाया जाऊ नये, याची खबरदारी आता बागायती क्षेत्रात सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here