
File Photo
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : सातबारा दुरुस्ती आणि फेरफार दुरुस्तीची मंजुरी देण्यासाठी 31 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शहरानजिकच्या खेडशी बुधवारी करण्यात आली.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकास-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ चिपरीकर (39, रा. रत्नागिरी ) असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, तक्रारदार यांचे पक्षकार यांचे नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्याकरता 10 हजार तसेच त्यांचे इतर पक्षकार यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्यासाठी 21 हजार रुपये अशी एकूण 31 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
बुधवारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने खेडशी येथे सापळा लावला होता. त्यानंतर तक्रारदाराकडून 31 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी अमित चिपरीकरला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकास-यांनी दिली.
.हेही वाचा
कोल्हापूर : बाजार समिती निवडणूक- दोन्ही काँग्रेसबरोबर शिंदे शिवसेना व जनसुराज्य
पुणे जिल्ह्याच्या रिंगरोडसाठी पुन्हा नव्याने फेरमूल्यांकनाचे काम सुरू
Sanjay Raut : महाराष्ट्रात मोगलाई! सरकार जनतेलाच घाबरु लागले : संजय राऊत