चिपळूण ( रत्नागिरी ) – माझी संघटना संपामध्ये सहभागी होत नाही. परंतु नरेंद्र मोदींचे धोरण देश आणि कामगारविरोधी असल्यामुळे उद्या (ता. 8) होणाऱ्या संपात मी उतरलो आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे देशातील 10 लाख 42 हजार कामगार या संपात सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी “सकाळ’ला दिली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी बुधवारी (ता. 8 ) देशव्यापी संप पुकारला आहे. शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील या संपात सहभागी होणार आहे. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसप्रणीत कामगार सेनाही या संपात सक्रिय सहभाग घेणार असल्याने संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – तेरेखोल नदीतील खुबे कशामुळे झाले इतिहासजमा ?
प्रत्यक्षात 5 कोटी नोकऱ्या गेल्या
या पार्श्वभूमीवर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बॅंक, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, घर बांधकाम कामगार, महापालिका कामगार आदी विविध क्षेत्रांतील, आस्थापनांतील कामगार क्षेत्रात विस्तारलेले आहेत. मोदी सरकार देशातील जनतेला 2 कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र, प्रत्यक्षात 5 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. देशभरातील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही सोबत आहोत. देशात उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. 1 लाख 67 हजार कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडून ओरबाडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कामगार चळवळ संपवण्याच्या मार्गावर आहेत.
हेही वाचा – एसटी प्रवाशांंकडे हे असेल तर पैसेही बाळगण्याची गरज नाही
प्रमुख मागण्या
प्रमुख मागण्यांबाबत जगताप म्हणाले, कामगार कायद्यातील कामगारविरोधी आणि मालकधार्जिणे बदल मागे घेणे, कामगार कायद्याची अंमलबजावणी करा, नवीन पेन्शन योजना रद्द करा, सार्वजनिक क्षेत्र उद्योगांमधील निर्गुंतवणूक विक्री-खासगीकरण थांबवा, रेल्वे, विमा व संरक्षण यासारख्या देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे बंद करा, या मुख्य मागण्या आहेत.

News Story Feeds