रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा मी बारसूला जाणारच असे वक्तव्य करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे.

उद्योगपतींची सुपारी घेऊन प्रकल्प राबविला जात असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी बारसु येथील आंदोलकांनी रिफायनरीच्या माती परिक्षणाला विरोध केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना मज्‍जाव करत त्‍यांच्यावर लाठीचार्ज केला होता. यावेळी झालेल्‍या धापवळीत काही आंदोलक बेशुध्द पडले होते. यावरून राजू शेट्टी यांनी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्‍न सुरू आहे. बारसूतील शेतकरी एकटा पडला आहे. त्‍यांच्यावर हा अन्याय सहन करणार नाही. आम्‍ही या शेतकऱ्यांसोबत असून, राज्‍यातील शेतकऱ्यांनाही शेट्टी यांनी एकत्र येण्याची हाक देणार असल्‍याचं म्‍हंटले होते. तसेच बारसु येथील ग्रामस्थांची भेट घेणार असल्याचा निर्धार त्यांनी केला होता.

आता मात्र त्यांच्यावर जिल्ह्यात येण्यासाठी रत्‍नागिरी पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. याचा विरोध केल्‍यास आणि शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्‍न केल्‍यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्यात आलंय.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here