खेड; पुढारी वृत्तसेवा : बारसू काय चौपाटी आहे का, पिकनिकला जाताय. बारसुचा प्रस्ताव तुम्हीच पाठवला आणि आता लोकांना भडकवायला पण तुम्हीच जाताय का?, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे दुतोंडी साप की गांडूळ हेच कळत नाही, असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम  (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे – फडणवीस सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी बारसू दौऱ्याची घोषणा केली होती. यावर कदम (Ramdas Kadam) यांनी आज (दि.२) तोफ डागली . ते म्हणाले, बारसुला रिफायनरी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचे काम ते करणार आहेत.

बारसुला गेलात तर लोक तोंडावर थुंकतील. शरद पवारांना बाप म्हणताय, तर त्यांच्याकडून काहीतरी शिका. उद्धव ठाकरे हे दुतोंडी गांडूळ किंवा दुतोंडी साप आहेत. हेच कळत नाही. ठाकरे यांचा हा दुतोंडीपणा सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले. ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय त्यांच्याकडून काही तरी शिका, असा सल्लादेखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Ramdas Kadam : आदित्य ठाकरे यांची टीका करण्याची औकात नाही

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचा मुलगा व बाळासाहेब ठाकरे यांचा नातू एवढीच आदित्य ठाकरे यांची ओळख आहे. त्यापलीकडे त्यांची कोणतीच ओळख नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची टीका करण्याची औकात नाही, असा निशाणा कदम यांनी साधला.

हेही वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here