खेड; पुढारी वृत्तसेवा: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपविला. या प्रकरणी आज (दि.३) खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एल. निकम यांनी दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलैरोजी अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका नागरिकाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीअंती सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली. व लपविलेल्या मृतदेहाची माहिती दिली. खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६(आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दखल करण्यात केला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. सरकारी वकील अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व दंड अशी शिक्षा सुनावली.

हेही वाचा 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here