चिपळूण ( रत्नागिरी ) – हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, जेएनयू मध्ये 10 रुपयाची फी 600 रुपये झाली म्हणून विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चे काढले. त्याच विद्यापीठाच्या बाहेरील हॉटेलमध्ये जेएनयूचे विद्यार्थी महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये सिगारेट आणि पार्ट्यांसाठी खर्च करतात. ठाकरे सरकारमधील मंत्री गेट वे ऑफ इंडियावर मोर्चा काढून कश्मीर मुक्तीच्या घोषणा देतात. कॉंग्रेसने बाबरीचे समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास कधीही परवानगी दिली नसती. ठाकरे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. शिवसेना भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला पन्नास टक्के मंत्रीपद मिळाले असते. परंतु निवडणुकीच्या आधीच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते. आमच्याशिवाय सरकार होणार नाही, हे शिवसेनेला समजल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट सुरू झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना ठाकरे सरकारने बंद केल्या. जलयुक्त शिवारसारखी योजना बंद केली. हे दुर्दैवी आहे.
हेही वाचा – भाई जगताप म्हणाले, उद्याच्या संपात मी उतरलो आहे कारण…
लोटस आॅपरेशन नाही
आमचे कोणतेही लोटस ऑपरेशन चालू नाही. कोणतीही गोड बातमी येणार नाही. ठाकरे सरकारला काम करण्याची पाच वर्ष संधी दिली जाईल. सरकारमधील खातेवाटप झाले आहे. त्यामुळे सरकारने आपला कारभार गतीमान करावा. खडसे नाराज आहेत. परंतु ते पक्षाचे नुकसान करणार नाहीत.
– विनोद तावडे
हेही वाचा – तेरेखोल नदीतील खुबे कशामुळे झाले इतिहासजमा ?
एकाच विद्यापीठातून पदवी घेतली
शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी एकाच विद्यापीठातून पदवी घेतली आहे. सामंत यांच्या डीग्रीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची आहे, सांगत तावडे यांनी सामंत यांची पाठराखण केली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दमाने घ्यावा असा सल्लाही त्यांनी जाधवांना दिला.

News Story Feeds