खेड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अरोमा इंटरमिडिएट कंपनीत रिॲक्टर मधील ॲसीडने आज (शुक्रवार) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने अपघात घडला. या अपघातात कोणी जखमी झाल्याचे वृत्‍त नाही. कंपनीमध्ये आग लागल्याने नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे छोट्या कारखानदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, पाणी पुरवठ्या अभावी अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत होती.

आज (शुक्रवार) सकाळी प्लॉट नंबर डी.१४ मध्ये असलेल्या आरोमा इंटरमिडीएट या कंपनीत पाणी नसल्याने रियाक्टर थंड ठेवण्याची व्यवस्था नव्हती. मात्र तरी देखील आज (शुक्रवार) पाणी उपलब्ध होईल या अपेक्षेने कंपनीत रियाक्टर मध्ये अॅसिड भरून उत्पादन सुरू करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र उन्हाळा असल्याने वेगाने होणाऱ्या तापमान वाढीमुळे रियाक्टर मधील रसायनाने अचानक पेट घेतला. आगीचा भडका उडाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थ व जवळच्या कारखान्यातील कामगारांनी तातडीने लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दल व खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here