राजापूर; पुढारी वृत्तसेवा : बारसू रिफायनरीचा संघर्ष पेटला असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. ६) राजापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते बारसुला भेट देणार असून त्यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. पदाधिकाऱ्यांनी आज (दि.५) कोंबे येथील हेलीपॅडची पाहणी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे शनिवारी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. कोंबे येथे हेलिपॅड उभारण्यात आले आहे. तेथून ते राजापूरमार्गे बारसुला जाणार आहेत. परिसरातील कातळशिल्पे यांची पाहणी करुन रानतळे येथे ठाकरे प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, वैभव नाईक आदीसह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, तर दुसरीकडे प्रकल्पाच्या समर्थनार्थ माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रकल्प समर्थनार्थ व विरोधात यापूर्वी एकाच वेळी असे मोर्चे निघाले नव्हते. प्रथमच असे दोन परस्पर विरोधी भूमिकेतून मोर्चे निघणार असल्याने प्रशासनासह पोलीस दल सतर्क झाले आहे.

हेही वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here