चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पेठमाप येथील एन्रॉन पुलानजीकच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या तरुणाचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. आंबे काढणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. अल्ताफ सलीम सुर्वे (२३, सध्या रा.गोवळकोट रोड, पलोजी बाग, मूळचा आंध्रप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, अल्ताफ गुरुवारी दुपारनंतर घराबाहेर पडला होता. त्यानंतर पेठमाप परिसरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे नेमका विद्युत पुरवठा कशामुळे बंद पडला त्याचा शोध महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत घेतला जात असताना एका तरुणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर काही वेळाने मृत अल्ताफ सुर्वे याची ओळख पटली. ज्या झाडावर मृतदेह आढळला त्याच्या जवळून ३३ केव्ही ची अतिउच्चदाबाची विद्युत वहिनी गेलेली आहे.

तेव्हा झाडाच्या फांदीला विद्युत वहिनीचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार त्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साजिद सरगुरुह व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मृतदेह झाडावरून खाली घेण्यास पोलिसांना मदत केली.

हेही वाचंलत का?









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here