राजापूर : प्रतिनिधी बारसू नको तर आम्हाला नाणार द्या… तुम्हाला बारसु नको असेल तर आमच्याकडे नाणार आहे, नाणार मध्ये १० हजार एकर जमिनीची सम्मतीपत्र आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी जवाहर चौक येथे केले.

बारसू येथे उद्धव ठाकरे यांनी जर रिफायनरी रद्द झाली नाही तर आम्ही अखा महाराष्ट्र पेटवू असा इशारा दिला आहे. त्याचा समाचार घेताना प्रमोद जठार यांनी तुंम्ही साधी लोकांची चुल पेटवू शकत नाही, तर महाराष्ट्र काय पेटवणार? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच वेळाही मंत्रालयात गेला नाहीत, मग तुंम्ही महाराष्ट्र काय पेटवणार ? असा प्रश्न त्‍यांनी केला आहे.

जोपर्यंत इथे येवून उध्दव ठाकरे आम्हा प्रकल्प समर्थकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत, तो पर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. आंम्ही प्रकल्पसमर्थक या भारताचे नागरिक नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमदार राजन साळवी यांनाही या प्रकल्पाचे महत्व समजले आहे, मात्र त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना भूमिका बदलायला लावली आहे असेही जठार यांनी जवाहर चौक येथे स्पष्ट केले.

हेही वाचा :  









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here