पनवेल; पुढारी वृत्तसेवा : कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामोठे वसाहतीमधील वेंकट प्रेसिडंन्सी हॉटेल मधील हुक्कापार्लरमध्ये झालेल्या राड्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. 20 ते 25 जणांच्या टोळक्याने मारहाण केली असल्याचे चित्रण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मारहाण झालेला युवक आपल्या मित्रांसह हुक्का पार्लरमध्ये बसला होता. यावेळी 20 ते 25 जणांच्या टोळक्याने त्याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यापुर्वीच हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाले होते. मारहाण झालेल्या युवकाच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेतले असल्याची माहिती मारहाण झालेल्या युवकांच्या नातेवाईकांना कामोठे पोलीसांनी दिली.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here