Bailgada sharyat : आता राज्यात बैलगाडा शर्यत घेता येणार आहे. (Bullock Cart Race) बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. 

 राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले. यावेळी जल्लीकट्टू हा तमिळनाडू राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे विधिमंडळाने घोषित केले आहे, तेव्हा न्यायपालिका यापेक्षा वेगळा विचार करु शकत नाही. कायदेमंडळ हे ठरवण्यासाठी सर्वात योग्य आहे, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. आज सर्व बाजू न्यायालयाने ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here