
आंबोली : आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्या टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिवसाढवळ्या दिसला. येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे.
कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत, तर कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात. यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.