
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीत गुरूवारी (दि. २५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे दिली.
यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून ९० हजार लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
पुढच्या टप्प्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जाईल. जि.प. च्या ५५ गटात ही योजना राबविली जाईल. त्यासाठी तालुक्याला जिल्हा नियोजनमधून एक गाडी देण्यात येईल व गावा गावात जाऊन योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, असेही सामंत यांनी सांगितले. यावेळी माजी आ. सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: