चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी शहरालगतच्या वालोपे, पेढे व चिंचघरी येथे टाकलेल्या धाडीत चार हातभट्ट्या उध्वस्त केल्या. या कारवाईत एक लाख 35 हजार रुपयांचे रसायन व अन्य साहित्य जप्त करून विल्हेवाट लावण्यात आली आहे. मंगळवारी टाकलेल्या धाडीत संबंधित विभागाने चार जणांना अटक केली.

शहरा लगतच्या वालोपे व पेढे या परिसरात वाशिष्टी नदीकिनारी तीन हातभट्टी व चिंचघरी (ता. चिपळूण) येथील हातभट्टीवर छापे टाकण्यात आले. या चार ठिकाणी छापे टाकून 4700 लि. रसायन व हातभट्टी गावठी दारू 206 ली असा एकूण 1,35,240/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महेश नंदकुमार नागवेकर, मंदार मधुकर दिवेकर, मनोज दशरथ बुरटे, आशीष सुधाकर चाळके अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

डॉ. बी. एच. तडवी, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापुर तसेच सागर धोमकर जिल्हा अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. 23 मे) रात्री चिपळूण पोलिस कर्मचारी समवेत संयुक्तपणे ही धडक कारवाई करण्यात आली. याबाबत पुढील तपास निरीक्षक व्ही. एस. मासमार आणि दुय्यम निरीक्षक चिपळूण क्र.01 चे जे.एस. खुटावळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here