रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जयपूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर आरे-वारे येथे 70 एकर जागेवर प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्क उभारण्यात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली असून वर्षभरात या कामाला सुरवात होईल, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्हा नियोजनच्या 75 कोटीच्या मान्यतेची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत यापूर्वीच्या मंजुरीची उलट तपासणी घेण्याचा इशारा दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्हा पर्यटन विकास महामंडळासंदर्भात माझे मत चांगले नाही. आतापर्यंत या विभागाच्या अनास्थेमुळेच जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला आहे. पाचशे कोटी आणि सहाशे कोटी पर्यटन आराखडा आहे, सांगितले जाते. मात्र, प्रशासनानेदेखील वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे. आकडे फुगवून सांगू नका, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. ज्या एमटीडीसीला स्वतःचे रिसॉर्ट दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करता येत नाही. ते महामंडळ माचाळ आणि पर्यटन स्थळांचा विकास काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी हाणली. जिल्हा नियोजन समितीच्या 75 कोटीच्या कामांना यापूर्वी मंजूरी दिली आहे. ही मंजूरी तपासून पाहून वर्कऑर्डर दिलेली कामे सुरू केली जातील. उर्वरित कामांची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील यात्रास्थळांसाठी असलेली 50 लाखाची तरतूद वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये येथे पुन्हा एकदा नियुक्ती वाद

तंत्रनिकेतन बंद पडू देणार नाही

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद पडू देणार नाही. त्यातील त्रुटी दूर करून ते अद्ययावत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच याच परिसरामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याचा माझा मानस आहे. विद्यापीठाना निधी देऊन नवसंजीवनी देण्याचा माझा मानस आहे.

हेही वाचा – एसटी कामगार म्हणाले, …तर नियमातच काम करू

परप्रांतीय नौकांवर कारवाईच्या सूचना

महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये पर्ससिन नौकांना बंदी घातली आहे. मात्र, आपल्या हद्दीमध्ये येऊन परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. या परप्रांतीयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मत्स्य विभागाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

News Item ID:
599-news_story-1578500941
Mobile Device Headline:
प्राणी संग्रहालय, सर्प उद्यान  'येथे' होणार
Appearance Status Tags:
Snake Park Zoo Museum In Are Ware Ratnagiri Marathi NewsSnake Park Zoo Museum In Are Ware Ratnagiri Marathi News
Mobile Body:

रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जयपूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर आरे-वारे येथे 70 एकर जागेवर प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्क उभारण्यात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली असून वर्षभरात या कामाला सुरवात होईल, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्हा नियोजनच्या 75 कोटीच्या मान्यतेची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत यापूर्वीच्या मंजुरीची उलट तपासणी घेण्याचा इशारा दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्हा पर्यटन विकास महामंडळासंदर्भात माझे मत चांगले नाही. आतापर्यंत या विभागाच्या अनास्थेमुळेच जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला आहे. पाचशे कोटी आणि सहाशे कोटी पर्यटन आराखडा आहे, सांगितले जाते. मात्र, प्रशासनानेदेखील वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे. आकडे फुगवून सांगू नका, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. ज्या एमटीडीसीला स्वतःचे रिसॉर्ट दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करता येत नाही. ते महामंडळ माचाळ आणि पर्यटन स्थळांचा विकास काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी हाणली. जिल्हा नियोजन समितीच्या 75 कोटीच्या कामांना यापूर्वी मंजूरी दिली आहे. ही मंजूरी तपासून पाहून वर्कऑर्डर दिलेली कामे सुरू केली जातील. उर्वरित कामांची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील यात्रास्थळांसाठी असलेली 50 लाखाची तरतूद वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये येथे पुन्हा एकदा नियुक्ती वाद

तंत्रनिकेतन बंद पडू देणार नाही

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद पडू देणार नाही. त्यातील त्रुटी दूर करून ते अद्ययावत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच याच परिसरामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याचा माझा मानस आहे. विद्यापीठाना निधी देऊन नवसंजीवनी देण्याचा माझा मानस आहे.

हेही वाचा – एसटी कामगार म्हणाले, …तर नियमातच काम करू

परप्रांतीय नौकांवर कारवाईच्या सूचना

महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये पर्ससिन नौकांना बंदी घातली आहे. मात्र, आपल्या हद्दीमध्ये येऊन परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. या परप्रांतीयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मत्स्य विभागाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Vertical Image:
English Headline:
Snake Park Zoo Museum In Are Ware Ratnagiri Marathi News
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
पर्यटन, tourism, जयपूर, संग्रहालय, उदय सामंत, Uday Samant, जिल्हाधिकारी कार्यालय, विकास, प्रशासन, Administrations, वन, forest, महाराष्ट्र, Maharashtra, मत्स्य
Twitter Publish:
Meta Keyword:
Tourism Develoment News
Meta Description:
Snake Park Zoo Museum In Are Ware Ratnagiri Marathi News रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जयपूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर आरे-वारे येथे 70 एकर जागेवर प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्क उभारण्यात येईल
Send as Notification:

News Story Feeds

1 COMMENT

  1. It’s too bad to check your article late. I wonder what it would be if we met a little faster. I want to exchange a little more, but please visit my site casino online and leave a message!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here