सिंधुदुर्गनगरी;  पुढारी वृत्तसेवा : सिंधुनगरीत रविवारी (दि. २८) सायंकाळी दूरसंचार विभागाच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले. कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे दूरसंचार विभागाची फार मोठी हानी टळली.

प्रशासकीय संकुलानजीकच असलेला बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here