
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मडगाव मुंबई (Madgaon-Mumbai) वंदे भारत एक्सप्रेसचे उद्या दिनांक 3 जून रोजी होणारे उद्घाटन (Inauguration) ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे. ओरिसामध्ये बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण रेल्वे दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे प्राण गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही दुर्घटना घडली. (Vande Bharat Express Inauguration Canceled)
गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार होते. मात्र रेल्वे दुर्घटनेच्या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. (Vande Bharat Express Inauguration Canceled)
हेही वाचा