खेड, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी (दि.४) सायंकाळी ४ च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

खेडमध्ये आज दुपारी मळभ व ऊन सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वारा सुटला. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मातीचा सुगंध व हवेत काही प्रमाणात गारवा पसरला.

रविवारी सकाळपासून उष्णता वाढल्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींनी काही अंशी दिलासा मिळाला. आज काही मिनिटेच पडलेला पाऊस नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्याची चाहूल देऊन गेला. शेतकऱ्यांनी देखील आता पेरणीची लगबग सुरू केली आहे.

हेही वाचा 

The post रत्नागिरी: खेडमध्ये पावसाची हजेरी; उष्म्यापासून नागरिकांना दिलासा appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here