महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड औद्योगिक वसाहती मधील अतिरिक्त क्षेत्रामध्ये वेल खोले गावाच्या हद्दीत असलेल्या सीईटीपीच्या चेंबरला सायंकाळी अचानक आग लागली. या आगीमुळे  निर्माण झालेल्या धुराने काळीज विरखोले परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रस्तुत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी द्वारे बोलताना या गावातील नागरिकांनी केले आहे.

यासंदर्भात सीईटीपीच्या सूत्रांकडे विचारणा केली असता त्यांनी चेंबरला अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न एमआयडीसी फायर फायटर मार्फत सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आणले.  प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त चेंबरमध्ये आज पसरत असल्याचे निदर्शनास आल्याने दोन फायर फायटर ना बोलवण्यात आल्याची माहिती येथील प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे. या आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकलेले नाही हे आगे मध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

हेही वाचंलत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here