रायगड, पुढारी वृत्तसेवा : किल्ले रायगडावर ऐतिहासिक राज्यभिषेक सोहळच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व त्यांच्या  पत्नी .स्वाती म्हसे यांच्या हस्ते किल्ले रायगडावरील नगारखाना येथे विधीवत गडपूजन संपन्न झाले. या नंतर रात्रीच्या प्रहारात राजसदर येथे जागर शिवशाहीराचा स्वराज्याच्या इतिहासाचा शाहिरी मानवंदना कार्यक्रम प्रसंगी छत्रपती संभाजी राजे, संयोगीता राजे, यांच्यासमवेत असंख्य मावळे शिवभक्त मंत्रमुग्ध झाले शाहीरीच्या डफली वर थाप पडताच उपस्थित मावळे गरज करत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड चे फत्तेसिंह सावंत, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी डॉ. म्हसे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या शिवभक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देताना अत्यंत सूक्ष्म असे नियोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रात्रीच्या प्रहारात शाहिरांच्या जागर कार्यक्रम दरम्यान छत्रपती राजे याचा शिवकालीन इतिहास जागा होत अंगावर रोमांच उभे राहिल्याची भावना शिवभक्तांनी व्यक्त केली लाखो शिवभक्तांनी छत्रपतींचा गजर करत मंत्रमुग्ध होत शाहिरांनी दाद दिली.

हेही वाचलंत का?

1 COMMENT

  1. Hello Dear, are you actually visiting this web page on a
    regular basis, if so after that you will without doubt get
    pleasant know-how.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here