देवरुख; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील धामणी येथे दोन चारचाकींमध्ये झालेल्या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

गणपतीपुळेहून चिपळूणकडे जाणाऱ्या इको गाडीची पुणे-भोर येथून गणपतीपुळेकडे येणाऱ्या नेक्सॉन गाडीला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाडीमधील १२ जण किरकोळ जखमी झाले. ईको गाडी मधील महिंद्र प्रकाश थोरवे, दीप्ती महेंद्र थोरवे, ऋतिका रमेश उपाध्ये, नेहा रमेश पांडे, नीत्यानंद फाटक, मोहित फाटक, सत्यजित थोरवे, सुमित फाटक तसेच नेक्सॉन गाडी मधील छाया संतोष शिनगरे अविनाश ओंकार शिनगारे, नीता मंगेश शिनगरे, मंगेश अनंत शिनगारे अशी या अपघातामधील किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस नाईक बरगाले, कॉन्स्टेबल आव्हाड, लांडगे, खोंदल, पोलीस हवालदार कामेरकरट घनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे उपचारसाठी दाखल करण्यात आले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here