रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जागतिक तापमान वाढीचा परिणामामुळे मोसमी पावासाच्या आगमानाच्या वेळा आणि कालावधीत सातत्याने बदल होत आहे. यंदाही मोसमी पावसाचे आगमन लांबले असल्याने यावर्षी खरिपाचे वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तापमानवाढीचे परिणाम आता कोकणावरही जाणवू लागले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत उन्हाळी हंगामातील तापमानही कमालीचे वाढले आहे. पण या परिणामाचे आता दुष्परिणामही सोसावे लागत आहेत. यंदाच्या वर्षात चक्रीवादळाचे प्रमाणही वाढले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन नैसर्गिकरित्या तयार होणार्‍या नैऋत्य मोसमी वार्‍यावर याचा परिणाम होऊ लागला आहे. आता याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे.

सन 2021 मध्ये 9 जूनला मान्सून दाखल झाला होता; मात्र 2019, 2020 आणि 2022 या वर्षांत मान्सूनने आपले नेहमीचे वेळापत्रक बदलले आहे. यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवली आहे. पूर्वी वैशाख महिन्यात वळवाचा पाऊस कोसळत असायचा. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यात पावसाची हजेरी लागल्यानंतर नियमित पाऊस हा मृग नक्षत्रापासून हजेरी लावायचा; मात्र हे चित्र अलीकडच्या कालावधीत पूर्णतः बदलून गेले आहे. यामुळे शेतीच्या खरीप हंगामावरही आता परिणाम जाणवू लागला आहे.

मागील काही वर्षांतील पावसाचे आगमन

सन 2018 मध्ये मोसमी पाऊस 8 जूनला दाखल झाला, दुसर्‍या वर्षी म्हणजेच 2019मध्ये 22 जून, 2020 सालात 12 जून , 2021 मध्ये 9 जून आणि गेल्यावर्षी 2022 मध्ये 16 जून रोजी जाखल झाला. तर 2023 मध्ये अद्याप मोसमी पाऊस कोकणात सक्रिय झालेला नाही. तर काही भागात त्याने संथगतीने सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here