अलिबागः “जात नाही ती जात’ असे म्हणत जाती-पातीची मानसिकता घालवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; परंतु ही जात अजगरासारखी आहे. कितीही प्रयत्न करूनही जातीचे राजकारण अधिकाधिक घट्ट होत असल्याबद्दल जागतिक मराठी अकादमीच्या 17 व्या संमेलनाचे अध्यक्ष नागराज मंजुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
“शोध मराठी मनाचा 2020′ या संमेलनाची सांगता गुरुवार (ता. 9) झाली. या वेळी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे परखड मत मांडले. शिक्षण, राजकारणात जातीची बिजे मुद्दामहून रुजवली जात आहेत. यातून काही लोकांचे हेतू साध्य होत असले तरी ते देश, समाजहिताला घातक आहे. अशाही परिस्थितीत काही लोक जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागले आहे, हे स्वागतार्ह आहे. परदेशात “झिरो टॉलरन्स’ संकल्पना राबवली जाते. यातून कोणालाही अपशब्द वापरला जात नाही, अशआच प्रकारे येथील समाजानेही ही संकल्पना वापरून कोणत्याही व्यक्तीला जातिवाचक शब्द वापरायचे नाहीत, असे सर्वांनी ठरवले पाहिजे.
रेल्वेस्थानकात फेरीवाल्यांचे बस्तान
या वेळी नागराज मंजुळे यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल भाष्य करताना सांगितले की, प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य घटनेने मिळालेले आहे; परंतु त्यानंतर समाजमाध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रिया खूपच घातक असतात. अशा प्रकारच्या हिंसक प्रतिक्रिया व्यक्त होणे चुकीचे असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी मांडले. तीन दिवस चाललेल्या “शोध मराठी मनाचा 2020′ या संमेलनाची सांगता संमेलनाध्यक्ष नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीतून झाली. त्यांची ही मुलाखत जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी घेतली. समारोपाच्या कार्यक्रमासाठी मंचावर माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी चळवळीचे गिरीश गांधी, माजी आमदार मीनाक्षी पाटील, अमेरिकेतील बृहन्मराठी मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, चित्रपट निर्माते मेघराज भोसले, स्वागताध्यक्ष चित्रलेखा पाटील, डॉ. विजय चोरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

News Story Feeds