साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) – तब्बल सहा महिन्यानंतर तिलारी घाटातील एसटी वाहतूक आजपासून पुन्हा सुरु झाली .गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक जोडणारा आंतरराज्य मार्ग तिलारी घाट कोसळल्याने बंद होता. तो आजपासून पूर्ववत सुरु झाला.
शिवसेनेचे उप जिल्हा संघटक गोपाळ गवस, संदीप कोरगावकर, हेमंत आणि सर्वेश कर्पे, दौलत राणे, दत्ताराम देसाई आदींनी चंदगड बांधकाम विभागाचे उप अभियंता विजय सासणे, कनिष्ठ अभियंता जे. मुल्ला यांचे अभिनंदन तर चालक वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
4 जुलै 2019 ला मुसळधार पावसामुळे तिलारी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने आणि रस्ता बाजूपट्टीसह वाहून गेल्याने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या घाटाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होताच कालपासून हा घाट मार्ग वाहतुकीस पूर्णपणे मोकळा करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याबरोबर सिंधुदुर्ग, गोवा राज्यातील प्रवाशांची गैरसोय आता दूर झाली आहे.
हेही वाचा – मिऱ्या येथे या संशयामुळे मासेमारी नाैकेवर कारवाई
अतिवृष्टीचा तिलारी घाटाला तडाखा
या वर्षी अतिवृष्टी झाली चंदगड तालुक्यातील कोदाळी धामणे धरण दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मुख्य धरण, तेरवण मेढे उन्नेयी बंधारा यातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे या तिन्ही धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेल्याने तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या चाळीस वर्षांनंतर तिलारी नदीला महापूर आल्याने बऱ्याच गावांना तडाखा बसला होता. या अतिवृष्टीचा तिलारी घाटालाही मोठा तडाखा बसला. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने या घाट मार्गावरील दोडामार्ग, सिंधुदुर्ग, गोवा राज्य ते चंदगड, बेळगाव, कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मुसळधार पाऊस पडत असल्याने तत्काळ या घाटाची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही.
हेही वाचा – समाजहिताला जातीचे राजकारण घातक- नागराज मंजुळे
प्रतिक्षा संपली
दरम्यान गणेशचतुर्थी, दिवाळी सण आले. या सणापूर्वी तरी हा घाट मार्ग दुरुस्ती करण्यात यावा अशी नागरिक, प्रवाशी आणि व्यापाऱ्यांची मागणी होती; मात्र त्या दरम्यान हा घाट रस्ता वेळीच दुरुस्ती केला नाही. त्यामुळे प्रवाशी आणि व्यापारीवर्गावर मोठा परिणाम झाला. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. घाट मार्ग कधी सुरु होतो याकडे प्रवासी व व्यापाऱ्यांचे लक्ष होते.ती प्रतीक्षा आज संपली.

News Story Feeds