लांजा ( रत्नागिरी ) – लांजा नगरपंचायतीच्या गुरुवारी (ता. 9) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 73 टक्के मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवकपदासाठी 58 अशा 63 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शहरात मतदान प्रक्रिया शांततेत झाली. मतमोजणी शुक्रवारी (ता. 10) होणार आहे.
पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुमंत वाघधरे, शिवसेनेचे मनोहर बाईत, काँग्रेसकडून राजेश राणे तर अपक्ष उमेदवार म्हणून संपदा वाघधरे, रुपेश गांगण हे रिंगणात आहेत. यापैकी कोण नगराध्यक्षपदी विराजमान होणार, याकडे लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपकडून अखेरच्या टप्प्यात नीलेश राणे यांना प्रचारात उतरल्याने या नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगत आली आहे.
हेही वाचा – अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार
दोन तासात 15.37 टक्के मतदान
लांजा नगरपंचायतीसाठी गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. यावेळी 7.30 ते 9.30 या दोन तासात 15.37 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. कोठेही मतदान यंत्रे बंद पडले नाही. मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यानंतर सकाळी 11.30 पर्यंत 35.23 टक्के इतके मतदान झाले. 2,506 पुरुष व 2,159 महिला मतदार यांनी हक्क बजावला. 7.30 ते 3.30 पर्यंत 63.89 टक्के इतके मतदान झाले. या टप्प्यात एकूण 4, 318 पुरुष व 4, 140 महिला मतदारांनी मतदान केले. एकूण 8, 458 मतदारांनी बजावला. अखेरच्या टप्प्यात सरासरी 73 टक्के इतके मतदान झाले. 63 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून या सर्वांचा फैसला शुक्रवारी सकाळी होणार आहे.
हेही वाचा – तीन राज्यांना जोडणाऱ्या या घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू
अर्ध्या तासात निकाल
मतमोजणी सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता सुरू होईल. 18 टेबल लावण्यात येणार असून दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून सुमारे अर्ध्या तासात निकाल स्पष्ट आहे.

News Story Feeds