संगमेश्वर ( रत्नागिरी ) – शेताचे नुकसान करतो म्हणून गव्याला विजेच्या तारांचा शॉक देऊन ठार मारण्यात आले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुरल्याप्रकरणी पाच जणांवर आज गुन्हा दाखल केला आहे. त्यात गावच्या सरपंचांचा समावेश आहे. हा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे दोन महिन्यांपूर्वी घडला आहे.
याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी प्रियंका लगड यांनी दिलेली माहिती अशी – वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक या गावात गव्याला विजेचा शॉक देत ठार मारून त्याला तिथेच पुरण्यात आल्याचे कळले. यानुसार रत्नागिरी – चिपळूणचे विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका लगड यांनी, देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, सागर गोसावी, महादेव पाटील, मिलिंद डाफळे, अरविंद मांडवकर यांना घेऊन संबंधित गावाला भेट दिली. या वेळी गव्याचा पुरलेला मृतदेह उकरून काढला. हा प्राणी गवाच आहे, याची खात्री करण्यासाठी देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर तो प्राणी गवाच असल्याचे सिद्ध झाले.
हेही वाचा – तीन राज्यांना जोडणाऱ्या या घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू
सरपंचावरही गुन्हा दाखल
ही जागा सुरेश सीताराम सुटाके यांची असल्याचे समजले. या पथकाने सुटाके यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यांनी रानटी प्राणी शेतीला त्रास देतात म्हणून आपण शेताला तारेचे कुंपण घातले असून त्यात वीजप्रवाह सोडला होता. यात विजेचा धक्का लागून गवा ठार झाला. त्यांना साथीदारांसह त्याच जागी पुरल्याचे सांगितले. यानंतर या पथकाने सुटाके यांचा जबाब घेतला. त्यानुसार त्यांना पुरण्यासाठी मदत केल्याप्रकरणी बाळू घडशी, दत्ताराम गुणाजी मानकर, तुकाराम दादोजी सुर्वे यांच्यावरही गुन्हा दाखल केला. सुटाके यांनी या घटनेची माहिती सरपंच दिलीप मनोहर सुर्वे यांना दिली होती. त्यांनी ती शासनापासून लपवून ठेवली तसेच एकप्रकारे या प्रकाराला साथ दिल्याबद्दल त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – मिऱ्या येथे या संशयामुळे मासेमारी नाैकेवर कारवाई
तपासाला सहकार्य करण्याची ग्वाही बाॅन्ड पेपरवर
याबाबत सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले असून या तपासाला सहकार्य करू, अशी ग्वाही सर्वांनी एका बॉन्ड पेपरवर लिहून दिली आहे. यानुसार या पाचही जणांवर वनविभागाचा प्रथम गुन्हा अहवाल दाखल करण्यात आला असून यापुढे विभागीय वनाधिकारी यांच्यासमोर जबाब झाल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांना शिक्षा होईल, असे लगड यांनी सांगितले.
दुर्गंधीमुळे प्रकार उजेडात
हा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला होता; मात्र पुरलेला गवा कुजल्यानंतर त्याची दुर्गंधी येऊ लागल्याने गावात चर्चा सुरू झाली. यातून काहींनी वनविभागाशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश आले आहे.

News Story Feeds