सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. आज झालेल्या  मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. आता याचा आंबोली- गेळेतील लोकांना फायदा होणार आहे. या साठी सातत्याने आपण पाठपुरावा केला असून गेल्या अडीच वर्षात या प्रश्नाकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही आपण त्यांची या प्रश्नाबाबत सात ते आठ वेळा भेट घेतली परंतु याकडे त्यांनी दुर्लक्ष केले अशी टीका करून 1000 कुटुंबीयांना न्याय मिळाल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी समाधान व्यक्त केले ते झूम ॲपच्या द्वारे पत्रकारांशी बोलत होते

 ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडवून घेतला होता. चंद्रकांत पाटील यावेळी महसूल मंत्री होते. जेव्हा सरकार बदलले तेव्हा यास स्थगिती दिली.‌ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती स्थगिती उठवली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार भेटून लक्ष न दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला नव्हता प्रलंबित राहिला होता. आजच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले आंबोली येथे 1031 तर गेळेमध्ये 275 कुटुंबीय असून 1970 नंतर आलेल्यांना सुद्धा जमीन मिळणार आहे ज्या ठिकाणी वन जमिनी लागले आहेत त्यांचे वाटपही वनखात्याच्या परवानगीने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान चौकुळ गावाचा प्रश्न सुद्धा लवकरच सुटेल यासाठी आपण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले दरम्यान आंबोली गेळे गांवकबुलायतदार प्रश्न सुटल्याने या भागाचा पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे ते म्हणाले पर्यटनाचा विकास होत असताना पाचगणीच्या धरतीवर या भागाचा विकास करत करणार असून गोल्फ कोर्स, मुंबई विद्यापीठाची उपशाखा या ठिकाणी सुरू केली जाणार आहे दरम्यान गांवकबुलायतदार गावकऱ्यांना समान वाटप केले जाणार असून लवकरात लवकर जमिनीचे वाटप प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर जमिनीचा सर्वे करून अतिक्रमणे हटवून जमिनी ताब्यात दिल्या जातील असे ते म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी 729 हेक्टर जमीन आंबोली येथे असून गेळे येथे 260 हेक्टर जमीन असल्याचे सांगितले.

टीका करायचे घर घरातच

आंबोली गेळे गांवकबुलायतदार प्रश्न आपण वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न केला असून त्याला यश मिळाले आहे मात्र भाजपाने हा प्रश्न आपण सोडवण्याचा दावा केल्याबद्दल आपल्याला आनंदच आहे कारण युतीचे सरकार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला श्रेयवाद करायचा नाही टीका करणाऱ्याचे घर शेजारी असायला हवे असे म्हटले जाते ते तर आपल्या घरातच आहे असा टोला त्यांनी टीका करणाऱ्या वर पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते पुढे म्हणाले, मल्टीस्पेशालिटी प्रश्नही सुटेल यापूर्वी आपण सांगितले त्यानुसारच होणार असल्याचे ते म्हणाले सुभाष चंद्र बोस निवासी 500 जणांची शाळा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांदा ते बांदा योजना सुरू ठेवण्यासाठी सांगायला हवे होते. त्यांचे आणि आपले चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याने येत्या सहा महिन्यात जिल्ह्यात आणि मतदारसंघात विकासात्मक फरक दिसेल. आपण यासाठी अधिकचा वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान पक्ष वाढवण्याचे काम करणे हे

अजितदादांसाठी स्वाभाविक होते गांवकबुलायतदार प्रश्नी

उद्धव ठाकरे यांनी स्टे दिला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा स्टे उठवला आणि हा प्रश्न सोडवला असल्याचे सांगून उद्या आपण ब्राझील जनरल कौन्सिलर सोबत काजू प्रोडक्ट बाबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले









2 COMMENTS

  1. Hello there, I discovered your site via Google even as looking for a comparable subject, your site came up, it looks good.
    I’ve bookmarked it in my google bookmarks.
    Hello there, just turned into aware of your weblog thru Google,
    and found that it’s really informative. I am gonna watch out for
    brussels. I will appreciate in case you proceed this in future.
    A lot of folks shall be benefited from your writing.
    Cheers!

    Also visit my site; basement finish specialists

  2. It’s difficult to find educated people in this particular topic, however, you seem like you know what you’re talking about!
    Thanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here