नांदगाव : पुढारी वृत्तसेवा मुसधार पडणा-या पावसामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथे नांदगाव तिठ्ठाच्या काही अंतरावर जुनाट महाकाय वटवृक्ष उन्मळून पडला. यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. वीज पुरवठाही खंडित झाला आहे. सदरचा वटवृक्ष आज (शुक्रवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोसळला.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिकांनी वारंवार निवेदन देऊनही विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. घटनेदरम्यान काही शाळकरी मुले व नागरीक रस्त्यावरून जात असताना हा वटवृक्ष कोसळला, मात्र दैव्य बलवत्तर म्हणून कोणतीही ईजा कुणाला झाली नाही. त्याचबरोबर वटवृक्षा शेजारी विद्युत प्रवाहित तारा व पोल असल्याने त्याचेही नुकसान झाले. यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

दरम्यान स्थानिकांकडून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. वटवृक्ष रस्‍त्‍यावरून हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. जवळपास पर्यायी मार्ग नसल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प आहे. अनेक नोकरदार, एस.टी.बस व अवजड वाहतूक करणारी वाहने अडकून पडली आहेत.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here