आंबोली: पुढारी वृत्तसेवा : आंबोली – चौकुळ परिसरात गेल्या १० दिवसांत दमदार पाऊस पडत आहे. चौकुळ परिसरातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण (Phatakwadi Dam) पूर्ण क्षमतेने भरले आहे. १.५४ टीएमसी क्षमेतेचे हे धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. चंदगड तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांपैकी सर्वात मोठे धरण आहे. तर अन्य दोन जंगमहट्टी व जांबरे प्रकल्प आहेत. मात्र, ते पावसाळ्यात काहीसे उशीरा आणि धिम्या गतीने भरतात. यंदा फाटकवाडी पाणलोट क्षेत्रात ५०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या आठवड्यात आंबोली – चौकुळ परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे फाटकवाडी धरण (Phatakwadi Dam) ओव्हर फ्लो झाले आहे. शेकडो क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. २००८ पासून पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यन्वित करण्यात आला आहे. येथे वीज निर्मिती केंद्रही उभारण्यात आलेले आहे. चौकुळ – आंबोली परिसरातील अन्य काही पाण्याचे लहान मोठ्या स्त्रोतामुळे हे धरण जलद गतीने भरण्यास मोठी मदत होती. येथील परिसर हा निसर्गरम्य असून धरण परिसरात पर्यटन क्षेत्रात अनेक संधी निर्माण होऊ शकतात. याकडे शासन, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

फाटकवाडी धरणामुळे परिसरातील अनेक गावे समृद्धी आली आहेत. दरवर्षी सर्वात पहिले ओव्हरफ्लो होणारे धरण म्हणून अशी ओळख आहे. या प्रकल्पामुळे आम्हाला स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, अद्यापही शासनाने आम्हाला त्याचा मोबदला दिलेला नाही. तरी युती सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

-सखाराम फाटक, रा. फाटकवाडी, कानूर (ता.चंदगड)

हेही वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here