रत्नागिरी – तत्कालीन काश्‍मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्‍न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

हेही वाचा – अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार

कीर्तनसंध्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्‍मीरमधील युद्धाची गाथा त्यांनी उलगडली. श्री आफळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काश्‍मिरमध्ये अफगाणी टोळ्यांनी हल्ला केला. तेव्हा राजा हरिसिंगांनी मदत मागितली. अफगाण टोळीवाल्यांनी पादाक्रांत केलेला काश्‍मीरचा दोन – तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्‍यक पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्‍मीरच्या ताब्यात आला असता,’

हेही वाचा – तीन राज्यांना जोडणाऱ्या या घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू

प्रतिकुल परिस्थितीतही लष्कराची कामगिरी अप्रतिम

श्री. आफळे म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन काश्‍मीरने भारतात विलीन व्हायला संमती दिली होती. ती लक्षात घेता आता जो भाग पाकव्याप्त काश्‍मीर म्हणून ओळखला जातो, तोच तेव्हाचा एक – तृतीयांश भाग तेव्हाच भारतातच विलीन झाला असता. तो पाकिस्तानला मिळू शकला नसता. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेव्हाच्या लष्कराने केलेली कामगिरी अप्रतिम होती. मात्र त्याच वेळी पंडित नेहरूंनी भारत – पाक प्रश्‍न संयुक्त राष्ट्र परिषदेत नेला. त्यानंतर 1948 च्या जानेवारीत युद्धबंदी झाली आणि “जैसे थे’ स्थिती ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीर निर्माण झाला. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांहून अधिक काळ भारताला भेडसावत आहे, असे आफळेबुवा म्हणाले.

हेही वाचा – हापूसचा काढणी हंगाम लांबल्याने काय होणार परिणाम ? कशावर राहणार लक्ष ?

News Item ID:
599-news_story-1578650484
Mobile Device Headline:
…तर पाकव्याप्त काश्‍मीर निर्माणच झाला नसता
Appearance Status Tags:
Charudatta Buva Aphale Kirtan On India Pakistan Border Issue Charudatta Buva Aphale Kirtan On India Pakistan Border Issue
Mobile Body:

रत्नागिरी – तत्कालीन काश्‍मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्‍न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

हेही वाचा – अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार

कीर्तनसंध्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या काश्‍मीरमधील युद्धाची गाथा त्यांनी उलगडली. श्री आफळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काश्‍मिरमध्ये अफगाणी टोळ्यांनी हल्ला केला. तेव्हा राजा हरिसिंगांनी मदत मागितली. अफगाण टोळीवाल्यांनी पादाक्रांत केलेला काश्‍मीरचा दोन – तृतीयांश भाग भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून ताब्यात घेतला. राहिलेला एक तृतीयांश भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला आवश्‍यक पाठबळ आणि आदेश तेव्हाच्या सरकारकडून मिळाले असते, तर तो भाग तेव्हाच काश्‍मीरच्या ताब्यात आला असता,’

हेही वाचा – तीन राज्यांना जोडणाऱ्या या घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू

प्रतिकुल परिस्थितीतही लष्कराची कामगिरी अप्रतिम

श्री. आफळे म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन काश्‍मीरने भारतात विलीन व्हायला संमती दिली होती. ती लक्षात घेता आता जो भाग पाकव्याप्त काश्‍मीर म्हणून ओळखला जातो, तोच तेव्हाचा एक – तृतीयांश भाग तेव्हाच भारतातच विलीन झाला असता. तो पाकिस्तानला मिळू शकला नसता. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये तेव्हाच्या लष्कराने केलेली कामगिरी अप्रतिम होती. मात्र त्याच वेळी पंडित नेहरूंनी भारत – पाक प्रश्‍न संयुक्त राष्ट्र परिषदेत नेला. त्यानंतर 1948 च्या जानेवारीत युद्धबंदी झाली आणि “जैसे थे’ स्थिती ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीर निर्माण झाला. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांहून अधिक काळ भारताला भेडसावत आहे, असे आफळेबुवा म्हणाले.

हेही वाचा – हापूसचा काढणी हंगाम लांबल्याने काय होणार परिणाम ? कशावर राहणार लक्ष ?

Vertical Image:
English Headline:
Charudatta Buva Aphale Kirtan On India Pakistan Border Issue
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
कीर्तनकार, काश्‍मीर, पराभव, defeat, भारत, विजय, victory, पाकव्याप्त काश्‍मीर, संयुक्त राष्ट्र, United Nations
Twitter Publish:
Meta Keyword:
Apale Buva Comment News
Meta Description:
Charudatta Buva Aphale Kirtan On India Pakistan Border Issue विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्‍न निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here