संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) – येथील तालुका पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. सभापती  – उपसभापती निवड महाडीक यांच्या मर्जीप्रमाणेच झाल्याने संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील त्यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

संगमेश्‍वर तालुका पंचायत समिती सभापतीपदासाठी या वेळी जोरदार स्पर्धा झाली. निवडीआधी जया माने, माजी सभापती सुभाष नलावडे, राजेंद्र महाडीक यांचे बंधू आणि मुचरी पंचायत समिती गणाचे सदस्य बंडा महाडीक यांचेही नाव चर्चेत आले तर माजी उपसभापती दिलीप सावंत यांनाही स्पर्धेत आणण्यात आले. एकापेक्षा एक असे चार सरस उमेदवार स्पर्धेत आल्याने सभापती निवडीचा पेच निर्माण होणे स्वाभाविक होते.

हेही वाचा – …तर पाकव्याप्त काश्‍मीर निर्माणच झाला नसता

नलावडेंनी नाकारले उपसभापतीपद

निवडीआधी एका रात्रीत चमत्कार झाला आणि निवडीच्या दिवशी सकाळी 10 वाजता बंडा महाडीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे ही घोषणा वरिष्ठ पातळीवरून झाली. यात सभापतीपदासाठी महाडीक यांचे तर उपसभापतीपदासाठी सुभाष नलावडे यांचे नाव होते. मात्र, नलावडे यांनी उपसभापतीपद नाकारले. प्रेरणा कानाल निवडून आल्या. तर महाडीक बिनविरोध सभापती झाले.

हेही वाचा – अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार

शिवसेनेतही महाडीक यांनी दाखवले वजन

राजेंद्र महाडीक 10 वर्षे जिल्हाप्रमुख होते. संघटनेच्या पडत्या काळात त्यांनी संघटनेला नवी उभारी दिली होती. मात्र, त्यांचा संघटनेतील वाढता हस्तक्षेप काहींना नको होता. त्यातूनच त्यांना सहसंपर्क करून जिल्ह्यातून पर्यायाने तालुक्‍यातून बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू होता. या सर्वांवर मात करत महाडीक यांनी वरिष्ठ पातळीप्रमाणेच संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील वजनही दाखवून दिले आहे.

अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते..

जिल्हाप्रमुख पदावरून राजेंद्र महाडीक यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख करून जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याची खेळी करण्यात आली होती. त्यामुळे महाडीक यांचे संघटनेतील विशेषतः संगमेश्‍वर तालुक्‍यातील वजन कमी झाल्याचे भासवण्यात येत होते. यातूनच सभापतीपदाच्या निवडीत बंडा महाडीक यांना अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते. या सर्वांची गणिते हेरून राजेंद्र महाडीक यांनी थेट वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आणि शेवटी त्यातच त्यांची सरशी झाली.

News Item ID:
599-news_story-1578651750
Mobile Device Headline:
संगमेश्‍वर तालुका शिवसेनेत 'यांचे' वजन पुन्हा सिद्ध
Appearance Status Tags:
Sangmeshwar Panchayat Sabhapati Selection On Mahadik Order Ratnagiri Marathi News Sangmeshwar Panchayat Sabhapati Selection On Mahadik Order Ratnagiri Marathi News
Mobile Body:

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) – येथील तालुका पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. सभापती  – उपसभापती निवड महाडीक यांच्या मर्जीप्रमाणेच झाल्याने संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील त्यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

संगमेश्‍वर तालुका पंचायत समिती सभापतीपदासाठी या वेळी जोरदार स्पर्धा झाली. निवडीआधी जया माने, माजी सभापती सुभाष नलावडे, राजेंद्र महाडीक यांचे बंधू आणि मुचरी पंचायत समिती गणाचे सदस्य बंडा महाडीक यांचेही नाव चर्चेत आले तर माजी उपसभापती दिलीप सावंत यांनाही स्पर्धेत आणण्यात आले. एकापेक्षा एक असे चार सरस उमेदवार स्पर्धेत आल्याने सभापती निवडीचा पेच निर्माण होणे स्वाभाविक होते.

हेही वाचा – …तर पाकव्याप्त काश्‍मीर निर्माणच झाला नसता

नलावडेंनी नाकारले उपसभापतीपद

निवडीआधी एका रात्रीत चमत्कार झाला आणि निवडीच्या दिवशी सकाळी 10 वाजता बंडा महाडीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे ही घोषणा वरिष्ठ पातळीवरून झाली. यात सभापतीपदासाठी महाडीक यांचे तर उपसभापतीपदासाठी सुभाष नलावडे यांचे नाव होते. मात्र, नलावडे यांनी उपसभापतीपद नाकारले. प्रेरणा कानाल निवडून आल्या. तर महाडीक बिनविरोध सभापती झाले.

हेही वाचा – अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार

शिवसेनेतही महाडीक यांनी दाखवले वजन

राजेंद्र महाडीक 10 वर्षे जिल्हाप्रमुख होते. संघटनेच्या पडत्या काळात त्यांनी संघटनेला नवी उभारी दिली होती. मात्र, त्यांचा संघटनेतील वाढता हस्तक्षेप काहींना नको होता. त्यातूनच त्यांना सहसंपर्क करून जिल्ह्यातून पर्यायाने तालुक्‍यातून बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू होता. या सर्वांवर मात करत महाडीक यांनी वरिष्ठ पातळीप्रमाणेच संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील वजनही दाखवून दिले आहे.

अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते..

जिल्हाप्रमुख पदावरून राजेंद्र महाडीक यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख करून जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याची खेळी करण्यात आली होती. त्यामुळे महाडीक यांचे संघटनेतील विशेषतः संगमेश्‍वर तालुक्‍यातील वजन कमी झाल्याचे भासवण्यात येत होते. यातूनच सभापतीपदाच्या निवडीत बंडा महाडीक यांना अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते. या सर्वांची गणिते हेरून राजेंद्र महाडीक यांनी थेट वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आणि शेवटी त्यातच त्यांची सरशी झाली.

Vertical Image:
English Headline:
Sangmeshwar Panchayat Sabhapati Selection On Mahadik Order Ratnagiri Marathi News
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
संगमेश्‍वर, स्पर्धा, Day, पाकव्याप्त काश्‍मीर, काश्‍मीर
Twitter Publish:
Meta Keyword:
Political News
Meta Description:
Sangmeshwar Panchayat Sabhapati Selection On Mahadik Order Ratnagiri Marathi News तालुका पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांचाच वरचष्मा दिसून आला आहे.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here