[adning id=”1976″]

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील पणदेरीमधील ३० वर्षीय तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला पुणे कोंढवा येथून अटक केली. तर पहिल्या दोन दहशदवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्या गोंदियातील अब्दुल कादीर पठाण (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे इसिसने (ISIS terrorists) कोकणासह राज्यभरात आपले जाळे पसरले असल्याचे उघड झाले आहे. पणदेरीमधील तरुणाच्या संपर्कात रत्नागिरी, रायगडमधील कोण कोण आहेत ? हे लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेसह एटीएसच्या तपासात उघड होणार आहे.

कोंढवा येथून पकडलेल्या डॉक्टरचे नाव अदनानली सरकार (वय ४३) असे आहे. त्याच्या कोंढव्यातील घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. त्याद्वारे डॉ. सरकार हा तरुणांना प्रेरित करून संघटनेत भरती करीत असल्याचे उघड झाले आहे. एनआयएच्या तपासानुसार, तो देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. पुण्यात एका इंजिनीअरला अटक केल्यानंतर एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोधमोहीम राबवली होती. (ISIS terrorists)

दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर अल सफाच्या रतलाम मॉड्युलचा पर्दाफाश झाला असून, तिसरा आरोपीही पकडला गेला आहे. यात आणखी सहा आरोपी अल सफाच्या रतलाम मॉड्युलमध्ये सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. यात दोन मुलींचाही समावेश आहे. त्यातील एक जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली महिलाही एटीएसच्या रडारवर असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी दहशतवादी कटात सहभागी असल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी गोंदियातून एकाला अटक केली होती. हा युवकही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here