
file photo
[adning id=”1976″]
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी – गुढीपूर येथे भरधाव कारने सायकलने जात असलेल्या शाळकरी मुलाला उडविले. यात सायकलस्वार विराज नीलेश तेली (वय 10, सध्या रा. पिंगुळी – गुढीपूर, मूळ रा.कणकवली ) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना आज (रविवारी) सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. विराज हा बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात पाचवीत शिकत होता. या घटनेने पिंगुळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज (रविवार) शाळेला सुट्टी असल्याने विराज हा आपली सायकल घेऊन नजीकच सायकलिंग करण्यासाठी गेला होता. पिंगुळी गुढीपूर येथे तो सायकलसह हायवे ओलांडत असताना दोडामार्ग येथून सिंधुदुर्गनगरीच्या दिशेने जाणा-या पोलीस कर्मचारी राजेश वासू गवस ( रा.दोडामार्ग) यांच्या ताब्यातील कारची विराजच्या सायकलला जोराची धडक बसली. यात विराज सायकलसह महामार्गावर फेकला गेला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी गवस यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने विराजला उपचारासाठी त्याच कारमधून कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी येथील ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर विराजचे वडील निलेश तेली यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे.
हेही वाचा :