कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : कणकवली विधानसभा मतदारसंघात डोकावण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मतदारसंघात लक्ष द्यावे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. मी माझ्या मतदारसंघात करोडोंचा निधी आणला. त्या तुलनेत तुम्ही तुमच्या मतदारसंघात किती निधी आणला? असा सवालही राणे यांनी वैभव नाईकांना केला आहे.

कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी कुडाळ ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी नगराध्यक्ष संजु परब, आनंद शिरवलकर, उद्योजक विशाल परब, दिपक नारकर आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले, आम्ही कुडाळ मतदारसंघाचे टार्गेट ठेवून काम करत आहोत. या मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भयावह झाली आहे. कुडाळ मतदारसंघाकडे लक्ष न देता आ. वैभव नाईक इतर मतदारसंघात डोकावत आहेत. आता आमचा आमदार, खासदार निवडून आल्यानंतर मागचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी आम्हाला पाच वर्ष जातील. एवढा मोठा बॅकलॉक आमदार नाईक यांनी उभा केला आहे, असा आरोपही राणे यांनी केला.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here