नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग (Sindhudurg)  जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरेतील युवक ओमकार उर्फ मुन्ना विलास महाडीक याने बुलेटवरुन तब्ब्ल ९ हजार कि.मी. अंतर कापत तळेरे येथून थेट लेह लडाख असा खडतर प्रवास पूर्ण केला. या प्रवासानतंर रविवारी (दि. ७) सायंकाळी तळेरे येथे तो दाखल झाल्यानतंर बाजारपेठ मित्रमंडळ तळेरेसह स्थानिक नागरीकांनी जल्लाषी स्वागत करत त्याच्या या धाडसाचे कौतुक करत सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे. (Talere to Leh Ladakh)

सध्या युवकांमध्ये विविध कलागुण असातात मात्र काही युवक हे ध्येयवेढे असतात. त्यांचे ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. असाच एक युवक म्हणजे तळेरेतील ओमकार विलास महाडीक तो मुन्ना या टोपण नावाने तळेरे प्रसिध्द आहे. मुन्नाने अनेक मित्रांना आपण बुलेटने प्रवास करुन लेह लढाखला जायाचे अशी संकल्पाना मांडली होती. मात्र त्याच्या जोडीला जाण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यानंतर मुंबईतील दोन मित्रांसोबत जाण्याचे नियोजन केले, मात्र ज्यावेळी तो निघणार होता त्यादिवशी त्या दोन मित्रांची अचानक कामे आल्याने त्यांनाही आपण येत नसल्याचे कळवले. (Talere to Leh Ladakh)

मित्रांनी अचानकपणे येणार नसल्याचा निरोप दिल्यानंतर ओमकार यांनी एकटे जाण्याची तयारी केला. तळेरे येथून त्याचा प्रवास सुरु झाला. त्याने तळेरे येथून मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, श्रीनगर, लेह लडाख असा थक्क करणारा सुमारे ९ हजार कि.मी.चा प्रवास १६ दिवसांत पूर्ण केला. ओमकार तळेरे ते लेह लडाख प्रवास पूर्ण करत रविवारी (दि. ७) तळेरेत दाखल झाला. यावेळी तळेरेत त्यांची जंगी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. आपले कुटुंब व मित्रांची साथ यामुळे आपण हा प्रवास पूर्ण केल्याचे सांगत आपला हा अनुभव माझ्या आयष्यातील अदभूत असल्याचे या तरुणाने सांगितले.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here