
जालगाव: पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील आंजर्लेजवळ असणाऱ्या मुर्डी या गावातून आकांक्षा बेनेरे (रा. राम मंदिर, मुर्डी) ही महिला बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी (दि. ५) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. (Ratnagiri)
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकांक्षा बेनेरे ही तिची मुलगी नेहा हिला सकाळी अंगणवाडीमध्ये सोडून कामावर जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मुलीला अंगणवाडी येथे सोडून ती निघून गेली. संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी ज्या ठिकाणी कामावर जाते, तेथे शोध घेतला. परंतु ती आढळून आली नाही. तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती आढळून आली नाही. म्हणून तिचे पती आनंद बेनेरे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. (Ratnagiri)
ही महिला एका रिसॉर्टमध्ये कामाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पंधरा दिवसांचा पगार घेऊन ती गेल्याचे समजते. मुलीला बालवाडीमध्ये सोडून गेल्यानंतर ती कुठेही आढळून आली नाही. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.
हेही वाचा