ओरोस; पुढारी वृतसेवा : सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणास आज (दि. ८) सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आला.

कोकण रेल्वेच्या बारा स्टेशन मधील सिंधुदुर्गनगरी या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण कामास आज सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग नगरी येथील सिंधुदुर्ग या रेल्वे स्टेशन सह कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या चार स्टेशनचे काँक्रिटीकरण रस्ता आणि सुशोभीकरण हाती घेतले आहे. या कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, माजी प.स सदस्य सुप्रिया , वालावलकर रानबाबुळी सरपंच परशुराम परब, परीक्षार्थी जिल्हाधिकारी विशाल, ओरोस सरपंच आशा मुरमुरे ,रानबांबुळी उपसरपंच सुभाष बांबुळकर ,माझी जि प सदस्य लॉरेन्स मानयेकर, सिंधुदुर्ग नगरी पोलीसचे स्थानकाचे पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, रोटरी क्लबचे नवीन बांदेकर, छोटू पारकर, अवधुत मालनकर देवेद्र सामंत, स्नेहा सावंत, प्रणीली अवसरे, रिया कदम, गोपाळ, ओरोस उप सरपंच गौरव घाडीगावकर, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये, विवेक बालम, पप्पा परब, सत्यवान चव्हाण, आदींसह सिंधुदुर्ग नगरी रानबांबुळी, ओरोस पंचकोशीतील ग्रामस्थ रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here