सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, भाजपनेच पालकमंत्री बदलावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. केसरकर हे कोल्हापूरला पर्यटनासाठी येत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे, असा टोला माजी गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी लगावला.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, कोण आपल्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीने कुठे गेले यावर आम्ही भाष्य करणार नाही. मात्र, राज्यात सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता फक्त काँग्रेसवरच जनतेचा विश्वास राहिला आहे. काँग्रेस निवडणुकांची वाट पाहत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. पण, भाजप निवडणुकांना घाबरत असल्याचे त्यांनी नमूद केले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here