जलगाव: पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील सोंडेघर ते मंडणगड रस्त्यावरील शीरखल आदिवासीवाडी फाट्यावर एका वृद्धाकडे सुमारे १२ किलो वजनाचे खवले मांजर आढळून आले. दापोली पोलिसांनी त्याच्याकडून मांजर ताब्यात घेतले आहे.

दापोली पोलीस ठाण्यात गणपती महादेव जळणे वनरक्षक दापोली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी बाळा गणपत लोंढे (वय ८२, रा. कोर्टीवाडी, पालगड) हा वृद्ध गुरूवारी (दि.१०) दुपारी दोनच्या सुमारास सोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या शीरखल आदिवासी वाडी फाटा पालघर येथे वनरक्षक व वन अधिकारी यांना आढळून आला. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता पिशवीमध्ये बेकायदेशीर विक्री करण्यासाठी नेत असलेले खवले मांजर आढळून आले.

दरम्यान, बाळा लोंढे याच्यावर दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here