कुडाळ : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार व मोटारसायकलच्या अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी मोटारसायकलस्‍वाराला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (सोमवार) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

कुडाळच्या दिशेने मोटरसायकलस्वार येत असताना गोवा येथून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या कारची मोटरसायकलला जोरदार धडक बसली. यात मोटरसायकलस्वार रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. जखमींना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्यासाठी कार्यवाही सुरू होती. सदर मोटरसायकलस्वार पावशी येथील असून, या अपघाताची माहिती मिळताच पावशीतील ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here