दाभोळ (रत्नागिरी) : दापोली शहरात सार्वजनिक ठिकाणी तुम्ही धूम्रपान करताय, मग थांबा दापोली पोलिसांची तुमच्यावर नजर आहे, तुम्ही धूम्रपान करत असताना तुमच्या नकळत तुमचा पोलिसांकडून मोबाईलवर फोटो काढला जातो व तो दाखवून तुमच्याकडून दंड वसूल केला जात आहे , पोलिसांच्या या कारवाईचे दापोलित स्वागत केले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 200 रुपये दंड हा कायदा होऊनही अनेक वर्षे झाली तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने दापोली शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या पान टपऱ्यांच्या समोर , आजूबाजूला अनेक जण सिगारेटचे कश मारत असल्याचे दिसून येतात.यातून शाळा महाविद्यालयात शिकणारी मुलेही सुटलेली नाहीत.
आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या दाभोळ रोडवर असलेल्या टपऱ्या मधून काळोख पडल्यावर सिगरेट घेऊन आझाद मैदानात जाऊन सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे हे पाहून दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे ठरविले. त्यांनी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – कोल्हापूरात राज्यभरातून येणार ही सुंदरी
सिगारेट ओढणाऱ्यांचा फोटो आता मोबाईलवर
कर्मचाऱ्यांचे एक पथक रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरऱ्यांजवळ जाऊन उभे राहिले त्यातील एकाने सिगारेट ओढणाऱ्यांचे मोबाईलवर फोटो काढले व नंतर सिगारेट ओढणाऱ्या व्यक्ती जवळ जाऊन त्याला सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असून आपण कायदा मोडला असून 200 रुपये दंड भरावा लागेल असे सांगून त्या व्यक्तीला तो सिगारेट ओढतानाचा फोटो पुरावा म्हणून दाखवून त्यांचेकडून 200 रुपये दंड भरून घेतला जातो. त्याला पावतीही दिली जाते.
क्लिक करा – कोल्हापूरातील दीपक ठरला कडबा कुट्टीत माहीर
दंडाची रक्कम कॅन्सर पीडितांना
गेल्या दोन दिवसात दापोली पोलिसांनी 40 जणांवर कारवाई करून 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली. ही कारवाई सुरूच राहणार असून जमा केलेली दंडाची रक्कम कॅन्सर पीडितांना देण्यात येणार आहे. तसेच गुटखा विकणाऱ्यां विरोधातही कारवाई आता सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे झुरके मारणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळं आता सिगारेट ओढायची आहे तर पाकिटात 200 रुपये आहेत की नाही याची खात्री करा.

News Story Feeds