रत्नागिरी : “राजा सिंह’ या महाबालनाट्यातील युवा कलाकार सेजल मिलिंद कदम (वय 16) हिचे ब्लड कॅन्सरने आज ता. 11 रोजी निधन झाले. उत्तम नृत्यांगना असणारी ही गुणी कलाकार अकाली गेल्याने कला क्षेत्रात दुःख व्यक्त होत आहे. पोलिस कर्मचारी मिलिंद कदम यांची ती मोठी मुलगी होती.
हेही वाचा– गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे ‘हे’ कनेक्शन पुन्हा चर्चेत… –
अहन क्रिएशनच्या राजा सिंह या नाटकात तिने महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह दिल्लीपर्यंत झालेल्या प्रयोगांत भूमिका साकारली. ती सध्या अकरावीत शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिला ब्लड कॅन्सरचे निदान झाले. कोल्हापूर येथे तिच्यावर उपचार सुरू होते. 20 दिवसात तिची आयुष्याशी झुंज सुरू होती, ती आज संपली. तिचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून जाणारा होता. शनिवारी (ता. 11) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे दोन लहान बहिणी, आई-बाबा असा परिवार आहे.
हेही वाचा – सावधान ! सिगारेट ओढताय..
तेव्हा ती सहावीला होती
राजा सिंहचे दिग्दर्शक केतन क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अहन क्रिएशनच्या शिबिरात सेजला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा ती सहावीला होती. तेव्हापण तिचा उत्साह व नवीन काही शिकण्याची जिद्द मनात जाणवायची. नंतर तिने फक्त नृत्य नव्हे; तर अभिनयाची चुणूक दाखवली. तिची एक्झिट खूपच धक्कादायक आहे. सतत हसतमुख सेजलचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही.

News Story Feeds