खेड; रत्‍नागिरी : पुढारी वृत्‍तसेवा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात येण्यासाठी एकेरी वाहतूक आज (सोमवार) दि.११ रोजी पासून सुरू करण्यात आली आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील अवघड असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्यातून लहान वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे पाऊण तास कमी होऊन अवघ्या तीन मिनिटा पर्यंत कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे रहदारी आणि अपघाताचे प्रमाण देखील यामुळे कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कशेडी बोगद्याच्या एका लेन मधून वाहतूक सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे.

कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बोगद्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी असलेला मार्ग असल्यामुळे चाकरमानी व पर्यटक यांचा वाया जाणारा वेळ आणि प्रवासात येणारा थकवा कमी होणार आहे. पाऊण तासाचे अंतर अवघ्या तीन मिनिटात पार होणार आहे. महत्वाचे म्हणजे रहदारी आणि अपघाताचे प्रमाण देखील यामुळे कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कशेडी बोगद्याच्या एका लेन मधून वाहतूक अखेर गणेशोस्तवापूर्वी सुरू झाली असल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here