जयंत धुळप, रायगड : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी व चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.  आज खारपाडा येथील सुविधा केंद्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र त्याचप्रमाणे शौचालयची व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास हा भरपूर लांब असल्यामुळे त्यांच्या वाहन चालकांना चहाची सुविधा मिळावी, त्याचप्रमाणे प्रवाशांना शौचालयाची व्यवस्था व्हावी याच दृष्टीने ही सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.  मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा पासून दर पंधरा किलो मीटरवर अशा प्रकारची सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 









2 COMMENTS

  1. Thanks for finally writing about > रायगड :  मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्राचे मंत्री रविंद्र चव्हाण
    यांच्या हस्ते उद्घाटन  | Maharashtra
    News < Loved it!

  2. At this time it seems like WordPress is the preferred blogging platform available
    right now. (from what I’ve read) Is that what you are using on your blog?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here