रत्नागिरी : प्रदूषणमुक्त कोकणसाठी रत्नागिरी सायकलिंग क्‍लब व वीरश्री ट्रस्टने आयोजित रत्नागिरी टू गोवा “कोकण भरारी’ सायकल सवारी या उपक्रमासाठी आज “सकाळ’ माध्यम समूहातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही सायकलपटूंच्या सरावाप्रसंगी भेटून या उपक्रमाचे कौतुक केले. रविवारपासून (ता. 12) दहा सायकलपटू यात रवाना होणार आहेत.

रत्नागिरी ते गोवा हा 282 कि.मी.चा प्रवास आहे. याची तयारी पूर्ण झाली असून सायकलपटू रविवारी पहाटे 5 वाजता रत्नागिरीतून निघणार आहेत. पुरेशी साधनसामग्री व सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. तसेच जिद्दी माउंटेनिअर्सचे सहकार्य लाभणार आहे. सायकल सवारीमध्ये डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगर, मंगेश शिंदे, माधव काळे, निमा काळे, किरण चुंबळकर हे सायकलपटू सहभागी होत आहेत.

हेही वाचा – देशभरातील मांजरे पाहायची आहेत..? या कोल्हापुरात….

रत्नागिरी ते गोवा हा 282 कि.मी.चा प्रवास..

पहाटे 5 वाजता शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयापासून सवारी सुरू होईल. पावस, पूर्णगड, आडिवरे, धारतळे, नाटे, जैतापूर, कात्रादेवी मंदिर, जामसंडे व देवगडपर्यंत 101 कि.मी.चा प्रवास होईल. दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मिठबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे या मार्गे वेंगुर्ले हा 106.5 कि.मी.चा प्रवास होईल. तिसऱ्या दिवशी मोचेमाड, शिरोडामार्गे करमाळी असा 77 कि.मी.चा प्रवास करून गोव्यात पोहोचतील.

हेही वाचा – कोल्हापूरातील दीपक ठरला कडबा कुट्टीत माहीर ….

सायकलिंग अविभाज्य घटक बनवूया…
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले, सायकलिंग क्‍लब आणि वीरश्री ट्रस्टतर्फे सायकलिंग, धावणे, बॅथले स्पर्धेमार्फत उपक्रम राबवले जातात. आपणही सायकलिंग हा जीवनाचा अविभाज्य घटक बनवूया व इंधनाची बचत करून प्रदूषण कमी करूया. यातून तंदुरुस्ती कायम राहील. निसर्गाच्या सान्निध्यात सायकलिंगचा थरार हे सारेजण अनुभवणार आहेत. प्रदूषणमुक्त कोकण व तंदुरुस्ती, प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा.

News Item ID:
599-news_story-1578750192
Mobile Device Headline:
'कोकणात भरारी' सायकल सवारी ….
Appearance Status Tags:
Bicycle Ride In Konkan Ratnagiri Marthi NewsBicycle Ride In Konkan Ratnagiri Marthi News
Mobile Body:

रत्नागिरी : प्रदूषणमुक्त कोकणसाठी रत्नागिरी सायकलिंग क्‍लब व वीरश्री ट्रस्टने आयोजित रत्नागिरी टू गोवा “कोकण भरारी’ सायकल सवारी या उपक्रमासाठी आज “सकाळ’ माध्यम समूहातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही सायकलपटूंच्या सरावाप्रसंगी भेटून या उपक्रमाचे कौतुक केले. रविवारपासून (ता. 12) दहा सायकलपटू यात रवाना होणार आहेत.

रत्नागिरी ते गोवा हा 282 कि.मी.चा प्रवास आहे. याची तयारी पूर्ण झाली असून सायकलपटू रविवारी पहाटे 5 वाजता रत्नागिरीतून निघणार आहेत. पुरेशी साधनसामग्री व सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. तसेच जिद्दी माउंटेनिअर्सचे सहकार्य लाभणार आहे. सायकल सवारीमध्ये डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगर, मंगेश शिंदे, माधव काळे, निमा काळे, किरण चुंबळकर हे सायकलपटू सहभागी होत आहेत.

हेही वाचा – देशभरातील मांजरे पाहायची आहेत..? या कोल्हापुरात….

रत्नागिरी ते गोवा हा 282 कि.मी.चा प्रवास..

पहाटे 5 वाजता शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयापासून सवारी सुरू होईल. पावस, पूर्णगड, आडिवरे, धारतळे, नाटे, जैतापूर, कात्रादेवी मंदिर, जामसंडे व देवगडपर्यंत 101 कि.मी.चा प्रवास होईल. दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मिठबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे या मार्गे वेंगुर्ले हा 106.5 कि.मी.चा प्रवास होईल. तिसऱ्या दिवशी मोचेमाड, शिरोडामार्गे करमाळी असा 77 कि.मी.चा प्रवास करून गोव्यात पोहोचतील.

हेही वाचा – कोल्हापूरातील दीपक ठरला कडबा कुट्टीत माहीर ….

सायकलिंग अविभाज्य घटक बनवूया…
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले, सायकलिंग क्‍लब आणि वीरश्री ट्रस्टतर्फे सायकलिंग, धावणे, बॅथले स्पर्धेमार्फत उपक्रम राबवले जातात. आपणही सायकलिंग हा जीवनाचा अविभाज्य घटक बनवूया व इंधनाची बचत करून प्रदूषण कमी करूया. यातून तंदुरुस्ती कायम राहील. निसर्गाच्या सान्निध्यात सायकलिंगचा थरार हे सारेजण अनुभवणार आहेत. प्रदूषणमुक्त कोकण व तंदुरुस्ती, प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा.

Vertical Image:
English Headline:
Bicycle Ride In Konkan Ratnagiri Marthi News
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
प्रदूषण, Konkan, सायकल, रत्नागिरी, उपक्रम, सकाळ, पोलिस, नगर, शिवाजीनगर, Airport, कोल्हापूर, forest, इंधन, निसर्ग
Twitter Publish:
Meta Keyword:
Konkan Ratnagiri Bicycle Ride News
Meta Description:
Bicycle Ride In Konkan Ratnagiri Marthi News
प्रदूषणमुक्त कोकण साठी सायकल सवारी रत्नागिरी ते गोवा हा 282 कि.मी.चा प्रवास आहे. यामध्ये डॉक्टरांचा उस्फुर्त सहभाग…
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here