
File Photo
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जयगड येथे समुद्रात साई गणेश नावाची मासेमारी नौका बुडाली. ही घटना मंगळवार 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
बोटीवरील खलाशी आणि मासेमारी जाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. जयगड येथील संतोष हळदणकर यांच्या मालकीची ही मासेमारी नौका असल्याची माहिती फिशरिज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बोट मासेमारी करीता जयगड समुद्रात जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बोटीवर तीन ते चार खलाशी होते. जयगड दीपगृह येथे ही दुर्घटना घडली. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उड्या टाकत स्वतःचा जीव वाचवला. बोटीवरील मासेमारी जाळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून बुडालेली बोट काही काळानंतर किनाऱ्यवर ओढून नेण्यात आली. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.